दुष्काळात तेरावा म्हणतात ना, अगदी खरं आहे ते. काही तासांचीच गोष्ट आहे. मी काही कामानिमित्त अंधेरीला गेलो होतो. ते काम मनासारखं पूर्ण झालं नाही. घरी परत येताना गर्दी म्हणजे प्रचंड, अगदी तूफान. बसमध्ये चढताना माझा नवा कोरा करकरीत Nokia C5 कधी पडला / ढापला गेला ते कळलंच नाही. ते मॉडेल नवीनच launch झालं होतं. GPRS, Nokia Maps सारखे hi-fi features असणारं. पण देव मारी त्याला कोण तारी? असो!

हिरमुसलेल्या चेहऱ्याने परत येत होतो. एका सहप्रवास्याचा cell घेऊन माझा number try केला. “Busy” होता. “चोराने बहुतेक माझं SIM काढलं असेल” असा विचार मनात आला. मग आणि एकाचा cell घेऊन घरी call केला, माझं SIM block करायला सांगितलं.

व्यथा इथेच संपली असती तरी ठीक होतं. पण नशीब सुद्धा नेमकं आजच – Lift चं दार उघडायला जाताना बरोबर lift वर जाणं, जेवणात हमखास एक-दोन केस सापडणं – अशे छोटे-छोटे प्रकार घडवत होतं. घरी आल्यावर online chess खेळायला घेतले, तर तिथे सुद्धा मात. दिवसाखेरीस बहिणीने बाबांच्या good old saying ची आठवण केली –

When difficulties come to you, they don’t come singly; they come in a battalion.

Edit: http://indiatoday.intoday.in/site/Story/109295/India/moderate-quakes-hit-andaman,-thane.html

Advertisements